माननीय डॉ. न्यायमूर्ती धनंजय य. चंद्रचूड, भारताचे सरन्यायाधीश
सेंट स्टीफन्स महाविद्यालय, नवी दिल्ली येथून अर्थशास्त्र विषयातील विशेष प्राविण्यासह कला शाखेची पदवी, कॅम्पस लॉ सेंटर, दिल्ली विद्यापीठ येथून विधी शाखेची पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे हार्वर्ड लॉ स्कूल, अमेरिका येथून विधी शाखेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि न्यायशास्त्र (एस. जे. डी.) विषयात डॉक्टरेट मिळविली. महाराष्ट्र बार कौन्सिल मध्ये नाव नोंदणी आणि प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालय आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय येथे वकिली. सन १९९८ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता आणि अतिरिक्त महान्यायअभिकर्ता म्हणून नामनिर्देशन.
मुंबई विद्यापीठात तुलनात्मक घटनात्मक कायदा या विषयाचे अभ्यागत प्राध्यापक. अमेरिकेतील ओक्लाहोमा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ येथे अभ्यागत प्राध्यापक.
ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठ, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि दक्षिण आफ्रिकेतील वीटवॉटरस्रांन्ड विद्यापीठ येथे व्याख्याने दिली. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांनी तसेच संयुक्त राष्ट्रांच्या उच्च मानवाधिकार आयोग, जागतिक कामगार संघटना, संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरणविषयक कार्यक्रम, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक यांनी आयोजित केलेल्या परिषदांना वक्ता म्हणून उपस्थिती.
२९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर पदोन्नती. महाराष्ट्र न्यायिक अकादमीचे संचालक.
३१ ऑक्टोबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.
१३ मे २०१६ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती.
९ नोव्हेंबर २०२२ रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.