Close

    एनस्टेप

    न्यायप्रकरणांच्या शीघ्र विमोचनामध्ये समन्स आणि आदेशिका बजावणी याबाबत असलेल्या पारंपारिक पद्धतीमुळे वारंवार अडथळा येत असतो.एनस्टेप. ही एक केंद्रीभूत सेवा प्रक्रिया प्रणाली आहे की ज्या द्वारे वेब अॅप्लिकेशन आणि सहाय्यभूत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी असणाऱ्या मोबाईल अॅपद्वारे मागोवा घेण्याची सुविधा प्राप्त होते. एनस्टेप.मोबाईल अॅप हे बेलीफ तसेच आदेशिका बजावणारे यांना दिले गेल्यास, पारदर्शीपणे सूचना आणि समन्स या प्रत्यक्षवेळेत बजावण्याचे कामाचा मागोावा घेता येईल. संबंधित न्यायालयाने सीआयएस सॉफ्टवेअरद्वारे एकदा ही प्रक्रिया स्वीकृत केली की ती एनस्टेप संकेतस्थळावर इलेक्ट्रोनिक नमुन्यात उपलब्ध होईल. एनस्टेप वेब अॅप्लीकेशनद्वारे प्रकाशित आदेशिका बेलीफ यांना वाटप होऊन त्यांच्या क्षेत्रात बजावता येतील. याद्वारे प्रकाशित आदेशिका यांचे आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य यातील संबंधित न्यायालयांमध्ये वाटप सुलभ होईल.

    एनस्टेप मोबाईल अॅपवर बेलीफ यांना वाटप केलेल्या आदेशिका पाहता येतील. अँड्रोईड स्मार्ट फोन हे बेलीफ यांना पुरविण्यात येत असून आणि त्या फोन्सवर न्यायालयाच्या सेवा यांची मोड्यूल्स अंगीकृत केलेली अाहेत. बेलीफ यांना जीपीएस लोकेशन, प्राप्तकर्त्याचे किंवा इमारतीचे छायाचित्र (ज्यावेळी बजावणीसाठी कोणीही उपलब्ध नसते अश्यावेळी), प्राप्तकर्त्याची स्वाक्षरी आणि घटनास्थळी नोंदविलेली बजावणी न होण्याकरिताची कारणे ही मिळू शकतील. प्राप्त माहिती त्वरेने केंद्रीय एन.एस.टी.इ.पी अॅप्लीकेशनला कळवण्यात येतील. एन.एस.टी.इ.पी वेब अॅप्लीकेशनद्वारे माहिती सीआयएसला अग्रेषित केली जाईल, न्यायालयांना बजावणीबाबत त्वरेने मागोवा घेता येईल. या प्रकारे एन.एस.टी.इ.पी खालील महत्वपूर्ण उद्देश साध्य करेल.

    • इलेक्ट्रोनिक माध्यमातून सूचना / समन्स यांची बजावणी शक्य होणे.
    • प्रत्यक्ष वेळेचे अभिलेखन तथा नोंद की ज्याद्वारे दूरस्थ स्थळावरील आदेशिका बजावणी बाबतचा अत्यंतिक विलंब हा कमी करता येईल.
    • आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य आदेशिका डाकेद्वारे बजावण्यासाठी लागणारा वेळ हा इलेक्ट्रोनिक पद्धतीने बजावणी केल्याने अत्यंत कमी होईल.
    • सर्व संबंधितांकडून आदेशिका किंवा समन्स यांच्या बजावणीचा पारदर्शीपणे मागोवा घेता येईल.
    • भुवन मॅप्सद्वारे जीपीएस अनुबंधन (भुवन मॅप्स हे इस्रो द्वारा भारताच्या भौगोलिक मंचावर विकसित केले आहेत).