Close

  उच्च न्यायालयांसाठी एन.जे.डी.जी. चे अनावरण

  Publish Date: December 19, 2020
  njdg-launch

  श्री.के.के.वेणुगोपाल, भारताचे महान्यायप्रतिनिधी यांनी दि. ३ जुलै २०२० रोजी डॉ. न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड, अध्यक्ष, ई-समिती, श्री.तुषार मेहता, भारताचे कायदेविषयक सल्लागार, श्री.बरूनमित्रा, सचिव (न्याय), मा.न्यायमूर्ती आर.सी.चव्हाण, उपाध्यक्ष ई-समिती, श्री.संजीव काळगावकर, महासचिव, भारताचे सर्वोच्च न्यायालय, आणि अन्य ई-समिती सदस्यांच्या उपस्थितीत एन.जे.डी.जी. चे अनावरण केले.

  एन.जे.डी.जी. म्हणजे न्यायप्रकरणांचा समुच्च संग्रह आहे आणि त्याचे निर्माण लवचिक शोध वैशिष्ट्य यांचेद्वारे करण्यात आले आहे. दि. २३/०७/२०२० रोजी जिल्हा आणि तालुका न्यायालयातील ३,३४,११,१७८ प्रलंबित प्रकरणांची माहिती एन.जे.डी.जी. कडे आहे. हा माहितीसंग्रहhttp://njdg.e-courts.gov.in/njdgnew/index.php द्वारे संपर्क साधता येईल.

  उच्च न्यायालयात उपलब्ध असणारा ४३,७६,२५८ न्यायप्रकरणांचा माहिती संग्रह येथे पाहता येईल आणि https://njdg.e Courts.gov.in/hcnjdgnew/

  व्यापारसुलभता या श्रेणीमध्ये भारत २० श्रेणी पुढे आला आहे आणि एन.जे.डी.जी. चे निर्माण विश्व बँकेने सन्मानित केले आहे.