Close

    ई- न्यायालये सेवा मोबाईल अॅप

    ECourts APP

    देशातील न्यायालयांच्या माहितीबाबत क्रांतीकारक साधन म्हणून डीजीटल इंडिया अॅवॉर्ड हे ई-कोर्टस् सेवा मोबाईल अॅप्लिकेशनला प्राप्त झाले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर येथे ई-कोर्टस् सेवा मोबाईल अॅप्लिकेशन उपलब्ध आहे. न्यायप्रकरणांची स्थिती, वादसूची, न्यायालयीन आदेश, या सेवा प्रस्तुत मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे २४/७ उपलब्ध आहेत. न्यायिक संस्था, वादकर्ते, पोलीस, शासकीय यंत्रणा आणि अन्य स्वारस्यकर्ते यांचेकरीता हे एक उपयुक्त साधन आहे. विविध मापदंड जसे की, सीएनआर (जिल्हा आणि तालुका न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक न्याय प्रकरणाला दिला जाणारा एकमेव अनन्य क्रमांक म्हणजे सीएनआर), पक्षकारांचे नाव, प्रथम खबरी अहवाल क्रमांक, न्यायप्रकरणांचा संवर्ग किंवा संबंधित अधिनियम याद्वारे प्रलंबित न्यायप्रकरणांची माहिती प्राप्त करून घेता येते.

    राष्ट्रीय न्यायिक संस्था माहिती ग्रीड यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयातील उपलब्ध माहिती या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध होते. या अॅप्लिकेशनची उपयोगिता आणि लोकप्रियता यावरून दिसून येते की, हे अॅप्लिकेशन ४.६५ दशलक्ष वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

    हे अॅप्लिकेशन क़्यु-आर कोड सुविधेद्वारे अद्ययावत आहे. क्यू-आर कोड हा भ्रमणध्वनी द्वारे स्कॅन केला जावून उपयोगकर्त्याला त्यातील तपशील सहजपणे प्राप्त करता येतो. ई-कोर्टस् संकेतस्थळ आणि ई-कोर्टस् सेवा मोबाईल अॅप्लिकेशन यातून क्यू-आर कोड प्राप्त करता येतो. यामध्ये ‘ न्याय प्रकरणाचा पूर्वेतिहास हे वैशिष्ट देखील अंगभूत केले आहे की ज्याद्वारे कोणालाही विशिष्ट न्याय प्रकरणाचा त्याच्या पहिल्या सुनावणीच्या वेळेपासून ते सद्यस्थिती पर्यंतचा घटनाक्रम आणि पारित आदेश यांचा मागोवा घेता येतो. अॅपमध्येच लिंक्स / शृंखला यांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे प्रकरणातील आदेश आणि न्यायनिर्णय पाहता येतात. विधिज्ञांकरिता दिनांक निहाय वाद प्रकरण सूची हे वैशिष्ट देण्यात आले असून त्यामुळे त्या दिनांकाची वादसूची उपलब्ध होते.

    ई न्यायालये सेवा मोबाइल अँप्लिकेशनच्या खालील भाषांमधील माहितीपुस्तिकेसाठी  येथे क्लिक करा.
    1 इंग्रजीसाठी
    2 हिंदीसाठी
    3 कन्नडसाठी
    4 मराठीसाठी
    5 मल्याळमसाठी
    6 नेपाळीसाठी
    7 ओडियासाठी
    8 पंजाबीसाठी
    9तामिळसाठी
    10 तेलगूसाठी आणि
    11 गुजरातीसाठी