Close

  आभासी न्यायालये

  vcourt

  वादकर्ता किंवा विधीज्ञांची न्यायालयातील उपस्थिती कमी करून आणि न्यायप्रकरणांचा अभिनिर्णय आभासी मंचावर करणे ही वास्तविक न्यायालयांची संकल्पना आहे. न्यायालयाकडील संसाधनांचा कार्यक्षम वापर करून आणि पक्षकारांना त्याच्यांतील लघुवाद हे विमोचीत करण्यासाठी प्रभावी मार्ग निर्माण करणे यादृष्टीने ही संकल्पना उत्क्रांत झाली आहे. न्यायाधीश ज्यांची अधिकारिता संपूर्ण राज्य आणि कार्य २४x७ पर्यंत वाढविता येऊ शकते, त्याच्यामार्फत वास्तविक इलेक्ट्राॅनिक मंचावरुन न्यायालयाचे प्रशासन करता येऊ शकते. न्यायाधीश किंवा वादकर्ता यांनी प्रत्यक्ष न्यायालयात अभिनिर्णय किंवा उपाय याकरिता उपस्थित राहणे आवश्यक नाही. संपर्क हा केवळ इलेक्ट्रोनिक माध्यमातून होईल आणि दंडित करणे आणि दंडाचा किंवा भरपाईचा पुढील भरणा करणे याबाबी ऑनलाईन पूर्तता करण्यात येतील. इलेक्ट्रोनिक नमुन्यातील समन्स प्राप्त झाल्यावर आरोपीकडून स्वत:हून अपराध स्वीकृती किंवा प्रतिवादीकडून स्वतःहून वादकारणाची पूर्तता जेथे होऊ शकते, अशा न्यायप्रकरणांच्या विमोचनासाठी या न्यायालयांचा उपयोग करता येईल. अशी प्रकरणे दंड प्रदान केल्यानंतर निकाली म्हणून वर्गीकृत करता येतील. जसे की, आभासी न्यायालयात प्रभावीरित्या निकाली करता येतील अश्या न्यायप्रकरणांचा संवर्ग प्रथमतः जाणून घेतला पाहिजे, अशी आवश्यकता असल्याने विद्यमानकाळी आणि पथदर्शीप्रकल्प म्हणून खालील संवर्गाची न्यायप्रकरणे ही आभासी न्यायालयांकडून निकाली होण्यासाठी योग्य आहेत:-

  • मोटार वाहन अधिनियम याखालील अपराध (ट्रॅफिक चलन केसेस ).
  • किरकोळ अपराध ज्या मध्ये कलम २०६ अन्वये समन्स जारी करता येतात.

  Visit : http://vcourts.gov.in