आयसीजेएस
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीने तयार केलेल्या ‘भारतीय न्यायिक संस्थांमध्ये आयसीटी अंमलात आणण्यासाठीचा कृती आराखडा व राष्ट्रीय धोरण’ चे अंतर्गत न्यायिक संस्थांच्या क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगाचा वापर सुरु झाला.
इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टीस सिस्टीम म्हणजे आयसीजेएस ज्याद्वारे फौजदारी न्यायिक पद्धती प्रणालीच्या विविध स्तंभ जसे की, न्यायालये, पोलीस, तुरुंग आणि न्याय वैद्यकशास्त्र प्रयोगशाळा यामध्ये एकाच मंचावर ई-समिती द्वारा माहितीसंग्रह आणि माहिती यांचेसांधारहित पद्धतीने चलन वलन हस्तांतरण होऊ शकण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे.
आयसीजेएस मंचाचे सहाय्याने प्रथम खबरी अहवाल यांचा संग्रह आणि आरोपपत्र ही उच्च न्यायालये आणि त्याचे अधिपत्याखालील न्यायालये यांना प्राप्त होऊ शकतात. न्यायालयांच्या उपयोगासाठी पोलिसांकडून दस्तऐवज जसे की,प्रथम खबरी अहवाल, प्रकरण दैनिकी/ केस डायरी आणि आरोपपत्र हे पीडीएफ नमुन्यामध्ये अपलोड केले जातात. माहितीसंचाचे प्रमाणीकरण, पोहोच, उपयोगकर्त्याचा स्वयंपरिचय/ अभिनिर्धारण/ संपर्क, इलेक्ट्रोनिक अभिलेखाच्या संग्रहासाठीआणि परिरक्षणासाठी तांत्रिक पायाभूत सुविधांची निर्मिती याबाबी माहितीसंचाचे प्रमाणीकरण आणि माहितीचा विनिमय याबाबींसोबत करण्याकडे ई-समिती कार्यक्षमपणे काम करीत आहे.
प्रत्येक राज्यामध्ये आयसीजेएसची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयांना आयपीएस/ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांची सेवा घेण्याची विनंती करण्यात आली आहे, असे अधिकारी आयसीजेएस मंचावर माहितीसंचाचे एकात्मीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरतील. पोलीसांखेरीज राज्याचे अन्य विभाग जसे की, भविष्य निर्वाह निधी संघटना, वन विभाग, नगरपालिका प्राधिकरणा, श्रमिक कल्याण मंडळे, नगररचना प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासन यांचा देखील आयसीजेएसमध्ये सहभाग असावा, याकरिता एक नियामक अधिकारी नियुक्त करण्याची ही विनंती उच्च न्यायालये यांना करण्यात आली आहे.
न्यायप्रकरणाबाबतची सर्व माहिती न्यायालयांना प्रत्यक्षवेळी उपलब्ध होऊ शकत असल्याने आयसीजेएस मंच हा न्यायप्रकरण आणि न्यायालये व्यवस्थापनासाठी एक प्रभावी साधन ठरले आहे. समन्स आणि न्यायिक आदेश यांची त्वरेने पूर्तता करणे साध्य झाल्याने प्रभावी समय व्यवस्थापन सुनिश्चित होत आहे. फौजदारी न्यायिक प्रणालीची गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टया उत्पादकता वृद्धिंगत होत असल्याने आयसीजेएस हा एक मैलाचा दगड साध्य करणे ठरणार आहे.