स्वयंनिर्मित ई-मेल
सीआयएस सॉफ्टवेअरमध्ये विधीज्ञ आणि वादकर्ते यांना प्रकरणांची स्थिती, पुढील सुनावणीचा दिनांक, वादसुची, न्यायनिर्णय आणि आदेश असा तपशील प्राप्त व्हावा, याकरिता स्वयंनिर्मित ई-मेल पाठवण्याची सुविधा अंगभूत केली आहे. प्रस्तावित उपभोगकर्त्याने त्याचा ई-मेल पत्ता हा सी.आय.एस सॉफ्टवेअरमध्ये नोंदणीकृत केला पाहिजे. त्यानंतर वादकर्ते, विधीज्ञ, नोंदणीकृत विधी अंमलबजावणी अभिकर्ते आणि शासकीय विभाग यांना ई-मेलचे संप्रेषण केले जाईल. प्रणाली बनविताना त्यामध्ये वादसूची बाबत दैनिक अधिसूचना आणि महत्वपूर्ण बाबी जश्या की, पुढील दिनांक, न्याय प्रकरणांचे स्थानांतरण आणि निकालीकरण या सर्व बाबी निर्मिल्या जातील. पीडीएफ नमुन्यामध्ये आदेश/ न्यायनिर्णय हे देखील ई-मेल होण्याची सुविधा यामध्ये आहे.