Close

जिल्हा न्यायालये पोर्टल

districts courts portal

देशभरातील जिल्हा न्यायालयांच्या स्वतंत्र संकेतस्थळांसाठी उपयोगकर्त्यासाठी एक केंद्रीकृत पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा न्यायालयातील माहिती या पोर्टलद्वारे प्राप्त करता येते, म्हणून हे ६८८ जिल्हा न्यायालयांच्या संकेतस्थळाचे प्रवेशद्वार ठरले आहे.

स्वतंत्र संकेतस्थळामध्ये त्या जिल्हयात कार्यरत असणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांची सूची, रजेवर असणारे न्यायाधीश, सेवा प्रवेशाबाबत महत्वाच्या उद्घोषणा, परिपत्रके, पोलीस ठाणी आणि न्यायालये यांचे न्यायाधीकारिता क्षेत्र इत्यादी बाबत माहिती प्रदर्शित केली जाते. न्यायप्रकरणांची माहिती जसे की, त्यांची स्थिती, न्यायालयीन आदेश, वादसूची ही व अशी संबंधित माहिती देखील जिल्हा न्यायालय सेवा म्हणून या पोर्टलवर प्राप्त होते. सदर माहीती ही कोणत्याही ठिकाणाहून उपलब्ध होते व त्यामुळे न्यायालय संकुलांना भेट देण्याचे टाळता येते. परीणामतः न्यायालयाच्या भौतिक पायाभूत यंत्रणेवरील ताण कमी होतो.

Visit : https://districts.ecourts.gov.in/