Close

  ई- न्यायालये सेवा पोर्टल

  ecourts_services

  ई-न्यायालये प्रकल्प अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि उपक्रम यांचेकरिता एक केंद्रीय प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. नागरिक, वादकर्ता, विधीज्ञ, शासन आणि विधी अंमलबजावणी अभिकर्त्यांना देशभरातील न्यायिक संस्था प्रणालीच्या संदर्भातील माहिती या द्वारे प्राप्त करता येते. ई-न्यायालयांचे राष्ट्रीय पोर्टल हे प्रत्येक समयी माहितीचे संग्रहकर्ता म्हणून अनेक सेवा आणि विविधांगी माहिती यांचे संचालन करते, जसे की :

  • १. वादसूची
  • २. न्यायप्रकरणाची स्थिती : न्यायप्रकरण क्रमांक, प्रथम खबरी अहवाल क्रमांक, पक्षकाराचे नाव, विधिज्ञाचे नाव, दाखल क्रमांक, अधिनियम किंवा न्यायप्रकरणाचा संवर्ग अशाविविध शोध मापदंडानुसार प्रकरणाची माहिती उपलब्ध होवू शकते.
  • ३. दैनिक आदेश आणि अंतिम न्यायनिर्णय: सीएनआर क्रमांक, न्यायप्रकरण क्रमांक, न्यायालय क्रमांक, पक्षकाराचे नाव आणि आदेशाचा दिनांक अशाप्रकारे दैनिक आदेश आणि अंतिम न्यायनिर्णय माहिती उपलब्ध होवू शकते.

  Visit : http://services.ecourts.gov.in