२०२१ मधील शासकीय प्रक्रिया पुनर्रचना व डिजिटल रूपांतरणातील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीला आणि न्याय विभागाला शासकीय प्रक्रिया पुनर्रचना व डिजिटल रूपांतरणातील उत्कृष्टतेसाठी प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग यांच्यातर्फे राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात रु. २ लाखांचे रोख पारितोषिक, ट्रॉफी, आणि शासकीय प्रक्रिया पुनर्रचना व डिजिटल रूपांतरणातील उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. हैदराबाद येथे आयोजित २४ व्या राष्ट्रीय ई-शासन परिषदेत (NceG) हा पुरस्कार भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे (स्वतंत्र कार्यभार असलेले) केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार तपशील
नाव: National GOLD award for excellence in Government Process Re-engineering for Digital transformation
Year: 2021