डिजिटल न्यायालये

घर बसल्या प्रकरण नस्ती / कागदपत्रे पाहणे सुलभ व्हावे म्हणून न्यायालयीन कामकाज कागदविरहित / डिजिटल करण्यासाठी भारतीय न्यायसेवेचा हरित उपक्रम विकसित करण्यात आला आहे. न्यायाधीश, दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारांतील सर्व प्रकरण-संबंधित युक्तिवाद, आरोपपत्रे, न्यायालयीन आदेश इत्यादी पाहू शकतील. डेस्कटॉप ऍप्लिकेशन व्यतिरिक्त, ‘डिजिटल कोर्ट’ एक वेब ऍप्लिकेशन म्हणून देखील उपलब्ध आहे आणि कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम असली तरी ते थेट ब्राउझरवरून उघडता येऊ शकते. या दस्तऐवजात वेब ऍप्लिकेशनची कार्यक्षमता समाविष्ट असेल.
मुख्य वैशिष्ट्ये :
१. प्रकरणांची प्रलंबितता आणि निपटारा यांचे सनियंत्रण करण्याची सुविधा.
२.दस्तऐवज पाहण्याची तरतूद.
ई-फाइल केलेली प्रकरणे पहा.
आरोपपत्रे पहा.
अंतरिम आदेश/ न्यायनिर्णय पहा.
३. दस्तऐवजांमध्ये टिपा दाखल करण्याची सुविधा.
४. ‘जस्ट आय एस’ मोबाईल ऍपद्वारे चिन्हांकित केलेली महत्त्वाची प्रकरणे पाहण्यासाठी ‘जस्ट आय एस’ मोबाइल ऍपसोबत जोडलेले असणे.
५. ‘व्हॉइस टू टेक्स्ट’ रूपांतरणाची सुविधा.
६. अनेक भाषांमध्ये न्यायनिर्णयांचे भाषांतर करण्याची सुविधा.
७. तयार टेम्पलेट वापरून ओडीटी (ODT) फाइल स्वयंचलितपणे निर्माण होण्याची सुविधा.
८. ई-एस.सी.आर (eSCR) आणि उच्च न्यायालयाद्वारे पारित न्यायनिर्णय पाहण्याची सुविधा