ई-कोर्टस् मोबाईल अॅप आणि जस्टीस अॅप सेवेत भारतीय संहितेचा समावेश

ई-कोर्टस् मोबाईल अॅप आणि जस्टीस अॅप या दोन्ही अॅप्स यांना ‘इंडिया कोड’ / भारतीय संहिता हे नवे वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे, याद्वारे उपयोगकर्ता त्याच्या भ्रमणध्वनीवर सर्व अधिनियम, विनियमन आणि अधिसूचना यांचेशी संपर्क साधू शकतो. उदा. तुम्हाला जर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चा कोणताही अनुभाग/कलम संदर्भित करायचे असेल तर तुम्ही सहजगत्या या मोबाईल अॅप द्वारे ते पाहू शकता. आम्हाला आशा वाटते कि, हे वैशिष्ट या अॅपची उपयुक्तता वृध्दींगत करेल. आम्हाला आपला प्रतिसाद प्राप्त करण्यात आनंद होईल.