मा. श्री. न्यायमूर्ती अंजनी कुमार मिश्रा

• दिनांक १७ मे, १९६३ रोजी जन्म झाला.
• सन १९८८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.
• दिनांक ०८ जानेवारी, १९८९ रोजी वकील म्हणून नोंदणी केली.
• प्रामुख्याने नागरी, महसूल, एकत्रीकरण, संविधानात्मक आणि कंपनी या शाखांमध्ये वकिलीचा व्यवसाय केला.
• ते मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, उच्च न्यायालयाच्या नेमणुकीतील अधिकृत परिसमापक, इंडियन बँक आणि तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचे स्थायी काउन्सेल होते.
• त्यांना दिनांक १२ एप्रिल, २०१३ रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. त्यांनी दिनांक १० एप्रिल, २०१५ रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दिनांक १६ मे २०२५ पर्यंत काम केले.
• दिनांक ०१.०६.२०२५ पासून त्यांची भारताचे माननीय सर्वोच न्यायालयाच्या ई- समितीचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.