श्री अनुपम पात्रा

श्री. कुंतल शर्मा पाठक हे आसाम न्यायिक सेवेतील जिल्हा न्यायाधीश दर्जाचे अधिकारी आहेत. ते सन २००४ मध्ये सेवेत रुजू झाले. त्यांनी आसाम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून विविध पदांवर काम केले आहे. तसेच त्यांनी सह निबंधक (पीएम अँड पी)/सीपीसी, प्रबंधक (प्रशासन) आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे प्रबंधक तथा प्रधान सचिव म्हणून प्रशासकीय विभागात विविध पदांवर काम केले आहे. तसेच आसाम सरकारच्या न्यायिक विभागाचे विधी परामर्शी आणि सचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी ते सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीचे सदस्य (प्रोसेस) म्हणून रुजू झाले आहेत.