Close

  श्री.अतुल मधुकर कुऱ्हेकर

  Atul Madhukar Kurhekar
  • ईमेल: mp-ecommittee[at]aij[dot]gov[dot]in
  • पदनाम: सदस्य (प्रक्रिया)

  नागपूर येथून शास्त्र शाखेची बी.एस.सी. पदवी धारण. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ येथून एल.एल.बी. पूर्ण केले. मान्यता प्राप्त उबंटु आणि सी.आय.एस प्रमुख प्रशिक्षक. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठापुढे आणि नागपूर जिल्हा न्यायालयात दिवाणी तसेच फौजदारी शाखेकडे आठ वर्षे वकिली केली.

  • ऑक्टोबर १९९५ ते जानेवारी २००४ या काळामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीपदी कामकाज केले. जानेवारी २००४ पासुन उप निबंधक पदी नियुक्ती होइ पर्यंत दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर या पदी कामकाज केले.
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या उप निबंधक (न्यायिक) या पदी सप्टेंबर २००४ मध्ये नियुक्ती. त्या नंतर लघुवाद न्यायाधीश मुंबई, येथे नियुक्ती.
  • लघुवाद न्यायालय, मुंबई येथे मे २००८ पासून नियुक्ती आणि त्यानंतर महाराष्ट्र ज्युडीशीयल अॅकेडमी येथे नियुक्ती.
  • महाराष्ट्र ज्युडीशीयल अॅकेडमी येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून जुलै २००९ ते एप्रिल २०११ पर्यंत कामकाज आणि त्यानंतर सप्टेंबर २०१३ पर्यंत अतिरिक्त संचालक म्हणून कामकाज आणि त्यानंतर पुणे येथे न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
  • सप्टेंबर २०१३ ते नोव्हेंबर २०१४ पर्यंत जिल्हा आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश पुणे म्हणून नियुक्ती आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लाचलुचपत प्रकरणांच्या विशेष न्यायालय, शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई येथे निबंधक होई पर्यंत नियुक्ती.
  • मे २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निबंधक (विधी आणि संशोधन) या पदावर नियुक्ती.