Close

    मा. न्यायमूर्ती श्री एन. व्ही. रमणा, भारताचे सरन्यायाधीश

    nv.ramana
    • पदनाम: मुख्य आश्रयदाते

    एन. व्ही. रमणा, बी.एस.सी.,बी.एल. यांचा जन्म २७ ऑगस्ट, १९५७ रोजी कृष्णा जिल्हयातील पोन्नावरम गावात, एका शेतकरी कुटुंबात झाला. दिनांक १० फेब्रूवारी, १९८३ रोजी त्यांनी वकिलीची सनद घेतली. त्यांनी आंध्रप्रदेश उच्च न्यायालय, केंद्रीय आणि आंध्रप्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरणे व भारताचे सर्वोच्च न्यायालय येथे दिवाणी, फाैजदारी सांविधानिक, कामगार विषयक, सेवाविषयक आणि निवडणुक विषयक प्रकरणे चालविली. त्यांचा सांविधानिक, फौजदारी, सेवाविषयक आणि आंतरराज्य नदीविषयक कायदे यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी विविध शासकिय संघटनांसाठी पॅनेल वकील म्हणून सुद्धा काम पाहिले आहे. त्यांनी केंद्र शासनासाठी अतिरिक्त स्थायी सल्लागार तसेच हैदराबाद येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथे रेल्वे प्रशासनासाठी स्थायी सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आंध्रप्रदेश शासनाचे अतिरिक्त महा अधिवक्ता म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांची दिनांक २७ जून २००० रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी दिनांक १० मार्च,२०१३ ते २० मे, २०१३ या कालावधीत आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी भारतात आणि परदेशांत झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेऊन विविध कायदेविषयक महत्त्वाच्या विषयांवर पेपर्स सादर केले होते. त्यांची दिनांक ०२/०९/२०१३ पासून दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, दिनांक १७/०२/२०१४ पासून त्यांची भारताचे सर्वाेच्च न्यायालय येथे न्यायाधीश म्हणून तर दिनांक २४/०४/२०२१ पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.