Close

  डॉ.डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती,सर्वोच्च न्यायालय, भारत

  Dr Justice Dhananjaya Y Chandrachud
  • पदनाम: अध्यक्ष

  अर्थशास्त्र या विषयात सेंट स्टीफन्स कॉलेज, न्यू दिल्ली येथून बी.ए.ओनर्स. दिल्ली विद्यापीठाच्या कँपस लॉ सेंटर येथून एल.एल.बी. पदवी. हार्वर्ड लॉस्कूल, यु.एस.ए. येथून एल.एल.एम. आणि एस.जे.डी. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र मधुन सनद प्राप्त केल्या नंतर आणि मुंबई उच्च न्यायालय आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय येथे प्रामुख्याने वकिली. १९९८ मध्ये ज्येष्ठ वकील आणि भारताचे अतिरिक्त महान्यायाभिकर्ता म्हणून नियुक्ती.

  • दि.२९/०३/२००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर नियुक्ती.
  • महाराष्ट्र ज्युडीशियल अॅकेडमीचे संचालक.
  • दि. ३१/१०/२०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचे शपथग्रहण.
  • दि. १३/०५/२०१६ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती.
  • मुंबई विद्यापीठाच्या तुलनात्मक संवैधानिक विधी या विषयाचे अभ्यागत, प्राध्यापक आणि ओखलाहमा विद्यापीठ स्कूल ऑफ लॉ (यु.एस.ए.) येथे अभ्यागत प्राध्यापक.
  • ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल, आणि दक्षिण आफ्रिकेतील वीटवॉटरस्रंड विद्यापीठात भाषण प्रबोधन.
  • युनायटेड नेशन्स हाय कमिशन ऑन ह्युमन राईटस, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक येथे वक्ते यासह युनायटेड नेशन्सच्या संस्थामार्फत आयोजित परिषदांमध्ये वक्ते.